येत्या २२ तारखेला नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेला ‘महाधरणा’ कार्यक्रम हे जुन्या जनता परिवारातील पक्षांच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीने पहिले ठोस पाऊल आहे. त्यासाठी कुठलीही कालमर्यादा ठरवण्यात आलेली नाही, असे जनता दल (संयुक्त) चे अध्यक्ष शरद यादव यांनी म्हटले आहे. जनता परिवाराचा भाग असलेल्या पक्षांमधील एकता वाढली, तर भाजपशी लढण्याची त्यांची ताकद वाढेल असा दावा त्यांनी केला.

Story img Loader