कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माझ्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शुक्रवारी दिली. जपान आणि थायलंडच्या पाच दिवसांच्या दौऱयावरून परत येताना खास विमानात पत्रकारांशी बोलताना सिंग यांनी ही प्रतिक्रिया दिली.
सिंग आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये विविध विषयांवर मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये होती. त्या पार्श्वभूमीवर डॉ. सिंग म्हणाले, आमच्या दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चेमध्ये काहीही तथ्य नाही. सर्वच विषयांवर आम्ही एकत्रितपणे काम करतो आहोत. ज्यावेळी मला एखाद्या विषयावर सोनिया गांधी यांचा सल्ला घेणे आवश्यक वाटते. त्यावेळी मी त्यांचा सल्ला घेतो.

Story img Loader