भापााच्या निलंबित प्रवकत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. पैगंबरांच्या नावाखाली देशात चाललेला हिंसक निषेध सहन करणार नसल्याचे जमात उलेमा ए-हिंद या संघटनेनं जाहीर केले आहे. मात्र, इस्लामिक तत्वानुसार नुपूर शर्मा यांना माफ करायला हवे असे आवाहन त्यांनी मुसलमान बांधवांना केले आहे.

फतवा काढणार

जमातचे अध्यक्ष सुहैब म्हणाले की, आम्हाला देशभरात सुरु असलेला हा हिंसाचार मान्य नाही. तसेच भाजपाने नुपूर शर्मांना निलंबित केलं याचे आम्ही स्वागत करतो. पण इस्लामिक तत्वानुसार नुपूर शर्माला माफ केलं जावं. भारतात काद्याचे राज्य आहे. मात्र, आम्ही रसत्यावर उतरून नियम तोडायला आम्ही परवानगी देऊ शकत नसल्याचेही सुहैब म्हणाले. आम्ही याबाबत फतवा काढणार असल्याचेही सुहैब म्हणाले.

लोकांनी कोणत्याही हिंसाचारला पाठिंबा देऊ नये

तसेच लोकांनी कोणत्याही हिंसाचारला पाठिंबा देऊ नये. आम्ही असदुद्दीन ओवैसी आणि मोहम्मद मदानी यांच्याविरोधातही फतवा काढणार असल्याचे सुहैब म्हणाले. तसेच सरकारने मुस्लिम संघटना आणि त्यांना पैसे पुरवणाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी सुहैब यांनी केली आहे. जेणेकरून मुस्लिम संघटनांकडून देशात होणाऱ्या हिंसाचारावर आळा बसेल.