Women Trainers Compulsory In Gym And Swimming Pools : उत्तर प्रदेश महिला आयोगाच्या शिफारशीनंतर नोएडा प्रशासनाने शहरातील सर्व जिम, जलतरण तलावांमध्ये आणि योग केंद्रांवर महिला प्रशिक्षकांची नियुक्ती करणे बंधनकार केले आहे. महिलांची सुरक्षा आणि रोजगार वाढवण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचबरोबर महिलांच्या विरोधातील छेडछाडीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाने याबाबत नोव्हेंबर २०२४ शिफारशी केल्या होत्या.

दरम्यान, नोएडा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशात केवळ जिम, योग केंद्र आणि जलतरण तलावांचा समावेश आहे. हा आदेश ५ जानेवारी २०२५ रोजी जारी करण्यात आला होता आणि संबंधित आस्थापनांनी दोन दिवसांत आवश्यक नियुक्ती करणे आवश्यक आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

या आदेशात जिम आणि इतर संबंधित आस्थापनांसाठी त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांची ओळख पट‍वण्यासाठी प्रशिक्षणा दरम्यान आधार कार्ड बाळगणे आणि आस्थापनांमधील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही आणि डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर बसवणेही अनिवार्य केले आहे.

हे ही वाचा : EVM Manipulation : “झूठ के गुब्बारों को बुलंदी मिलें…” ईव्हीएमवरील आरोपांना ‘ECI’चे शायरीतून उत्तर; महाराष्ट्राचा दाखला देत फेटाळले आरोप

नोएडाच्या उपजिल्हा क्रीडा अधिकारी अनिता नागर यांनी सांगितले की, “महिलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हे नियम सर्व फिटनेस आस्थापनांना लागू होतील, ज्यात जिल्हाभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अअसेल्या जिम आणि जलतरण तलावांचाही समावेश आहे. या आस्थापनांच्या मालकांनी नवीन आदेशाचे पालन करून त्यांच्याकडे महिला प्रशिक्षकांची नेमनूक करणे आवश्यक आहे.” अनिता नागर यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना ही माहिती दिली आहे.

उपजिल्हा क्रीडा अधिकारी नागर पुढे म्हणाल्या, “क्रीडा विभागाकडे सुमारे ४०० नोंदणीकृत जिम, ३०० जलतरण तलाव आणि १०० क्रीडा अकादमी आहेत. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांमधील जिम आणि जलतरण तलावांचाही समावेश आहे.

हे ही वाचा : Satya Nadella: मायक्रोसॉफ्ट भारतात AI मध्ये ३ अब्ज डॉलर्सची करणार गुंतवणूक; सत्या नाडेलांची मोठी घोषणा!

महिला आयोगाच्या अहवालानुसार स्कूल बस, बुटीक, महिलांची कपडे विकणाऱ्या दुकानांमध्येही महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशीही करण्यात आल्या आहेत. महिलांना समाजात सक्रिय भूमिकेत आणणे आणि त्यांना कामाची सुरक्षित जागा उपलब्ध करून देणे हे या शिफारशींचे उद्दिष्ट आहे. त्याच वेळी, हे पाऊल विशेषतः व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि योग केंद्रांमध्ये राबविण्यात येत आहे, जेणेकरून महिलांसाठी रोजगार आणि सुरक्षा मिळेल.