लिव्ह इन रिलेशनशिप ही पद्धत आजकाल प्रचलित होत असली त्याच्या काही नकारात्मक बाजू वेळोवेळी समोर आल्या आहेत. नोएडामध्ये राहणाऱ्या एका ३५ वर्षीय लिव्ह इन पार्टनरने ५० वर्षीय महिलेचा खून केला. महिलेचे इतर पुरुषाबरोबर संबंध असल्याचा संशय व्यक्त करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, ३५ वर्षीय आरोपी गौतमला अटक करण्यात आली आहे. तो आणि ५० वर्षीय विनीता या नोएडाच्या सेक्टर ४२ मध्ये मागच्या तीन वर्षांपासून एकत्र राहत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर दोघेही एकत्र राहण्यास लागले. मंगळवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यावेळी आरोपीने महिलेला मारहाण केली, ज्यामुळे महिलेची शूद्ध हरपली. यानंतर आरोपीने घरातून पळ काढल, अशी माहिती पोलिसांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. शेजाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. आरोपीवर भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ३०२ नुसार खूनाचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास सुरू केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

आरोपी गौतमला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी हत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मृत महिला विनीताचे दुसऱ्या पुरुषाशीही संबंध असल्याचा संशय आल्यामुळे दोघांमध्ये भांडण झाले आणि त्यातून तिचा खून केला, अशी कबुली आरोपीने दिली. पोलिसांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदन चाचणीसाठी दिला असून आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली गेली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Noida man kills 50 year old live in partner suspecting her involvement with other men kvg