Noida Police News : आपण वाहन चालवत असताना आपल्याला अनेक नियमांचं पालन करावं लागतं. मग त्यामध्ये कार असो, दुचाकी असो किंवा अजून कुठलं वाहन असो. सर्वांना नियम लागू असतात. जर वाहन चालवताना नियमांचं पालन केलं नाही तर आपल्याला दंड आकारला जाऊ शकतो. रस्त्यावर कार, दुचाकी चालवताना नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. मात्र, आपण नियमांचं पालन केलं नाही तर वाहतूक पोलीस दंड आकारतात. आता यासंदर्भात उत्तर प्रदेशातील नोएडा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हेल्मेट न घालता कार चालवणाऱ्या नोएडामधील एका व्यक्तीला एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तुषार सक्सेना असं त्या व्यक्तीचं नाव आहे. तुषार सक्सेना हे पत्रकार असल्याचं सांगितलं जात आहे. एवढंच नाही तर त्यांना हा दंड न भरल्यास कायदेशीर परिणामांना सामोरं जावं लागेल, असाही इशारा देण्यात आला. मात्र, यानंतर तुषार सक्सेना यांनी पोलिसांत धाव घेतल्याचं फायनान्शिअल एक्स्प्रेसने एका वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, सध्या हे चलान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

nashik case filed against three individuals for causing accident by transporting iron bars
नाशिक अपघातास कारणीभूत तिघांविरुध्द गुन्हा, सळई पुरवठादाराचाही समावेश
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
crime increased in Nagpur
लोकजागर : पोलीस करतात काय?
police failed to prove, conviction , accused driving car allegation, mumbai,
बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप : आरोपीच गाडी चालवत असल्याचे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश, शिक्षा रद्द
On midnight of December 31st drunk driver stole bus and accident happened
३१ डिसेंबरच्या मध्यरात्री फेरफटका मारण्यासाठी मद्य पिऊन बसगाडीची केली चोरी, पण अपघात झाला अन्…
Police took action against 17800 reckless motorists
बेताल चालकांवर कारवाई, १७ हजारांहून अधिक चालकांना ८९ लाख रुपये दंड
case registered against Ferrari driver at revdanda police station zws
‘त्या’ फेरारी चालकाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

हेही वाचा : चार आठवड्यांत खुल्या कारागृहांची माहिती द्या! राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशमधील नोएडा येथील एका व्यक्तीला हेल्मेट न घालता कार चालवल्याने नोएडा पोलिसांनी एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड ठोठावण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव तुषार सक्सेना असं आहे. आता हे तुषार सक्सेना नोएडा शहरापासून २०० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामपूरमध्ये राहतात. मात्र, त्यांना हेल्मेट न घातल्याने दंड झाल्याचा त्यांच्या मोबाईलवर एक संदेश आला. त्यामुळे हे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी सुरुवातीला हा दंड चूक म्हणून आला असेल असे म्हणत दूर्लक्ष केलं. मात्र, त्यानंतर तुषार सक्सेना यांना ईमेल आणि अतिरिक्त संदेशाद्वारे संपर्क साधला गेला. हेल्मेट न घालता गाडी चालवण्यामुळे चलान झाल्याचे पाहून तुषार सक्सेना यांना धक्का बसला. कारण कार चालकांना हेल्मेट घालणं बंधनकारक नाही. आता हे चलान गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जारी करण्यात आलं होतं.

नोएडा पोलिसांकडे मागितला लेखी खुलासा

हेल्मेट न घालता कार चालवल्याने नोएडा पोलिसांनी एक हजार रुपयांचा दंड आकारल्याप्रकरणी तुषार सक्सेना यांनी नोएडा पोलिसांकडे लेखी खुलासा मागितला आहे. तसेच त्यांनी दंडाच्या कायदेशीरतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं की, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलं तर दंड आकारणे योग्य आहे. मात्र, आपण कधीही एनसीआर भागात कार चालवली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांना हा दंड मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.

Story img Loader