नोकिया कंपनीने आपल्या मोबाईल एडिशन्समधील सर्वात स्वस्त मोबाईल ‘नोकिया १०५’ भारतीय बाजारपेठेत सादर केला. नोकिया १०५ या मोबाईलची किंमत १,२४९ रु. एवढी आहे. तसेच या मोबाईलला ‘कलर स्क्रिन’ देण्यात आली आहे. “इतक्या कमी किमतीत कलर स्क्रिन असणारा हा मोबाईल ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल्सचे पर्व संपवणारा ठरेल आणि भारतीय ग्राहकांना कलर स्क्रिन मोबाईल वापराता येईल” असे नोकियाच्या दक्षिण विभागाचे व्यवस्थापक टी.एस.श्रीधर यांनी स्पष्ट केले.
याआधीच्या ‘नोकिया १२८०’ या नोकियाच्या सर्वातस्वस्त मोबाईलच्या एकूण १०० कोटींहून अधिक प्रती विकल्या गेल्या होत्या. त्यामुळे यावेळेससुद्धा ‘नोकिया १०५’ या हॅडसेटची रेकॉर्डब्रेक विक्री होईल अशी नोकियाच्या व्यवस्थापकांना आशा आहे.
(संग्रहित छायाचित्र)