ललित मोदी प्रकरणावरून संसदेत एकाकी पडलेल्या काँग्रेसविरोधात संसदेबाहेर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी बिगरकाँग्रेसी व बिगरभाजप पक्षांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, जदयू अध्यक्ष शरद यादव, के. सी. त्यागी आणि नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला यांची अत्यंत महत्त्वाची बैठक शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बुधवारी पार पडली. पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येण्यास या सर्वच नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आम आदमी पक्षाचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र या बैठकीपासून लांब राहिले. पवार यांच्या या रणनीतीमुळे दिल्लीतील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. बहुमत असलेल्या भाजपला या बैठकीमुळे सध्या फारसा फरक पडणार नसला तरी काँग्रेस पक्ष मात्र एकाकी पडला आहे. बिहारमध्ये जनता परिवाराच्या विजयासाठी शरद पवार प्रयत्न करणार असल्याचा दावा सूत्रांनी केला.
बैठकीसंदर्भात माहिती देताना मुलायमसिंह म्हणाले की, देशाच्या अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर आम्ही चर्चा केली. त्यावर आमचे एकमत झाले आहे. ज्यात शेती, महिला, खतांच्या किमती, जमीन अधिग्रहण विधेयकासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. दुष्काळ व अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राने काय मदत करावी यावरही चर्चा झाली. पवार यांच्या नेतृत्वाखाली अजून काही प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्ही एकत्र येणे ही अत्यंत सकारात्मक बाब आहे.
पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काँग्रेस विरोधावर चर्चा झाली. आगामी काळात होणाऱ्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्यासाठी शरद पवार प्रयत्न करीत आहेत. येत्या २२ सप्टेंबर रोजी दिल्लीत अरविंद केजरीवाल यांनी ‘सहकारी संघराज्य’ या विषयावर एक कार्यशाळा आयोजित केली आहे. यास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. यानिमित्ताने पवार यांनी बिगरभाजप व काँग्रेसी पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या धोरणात्मक रणनीतीवर चर्चा होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पवार उद्या मोर्चात
दुष्काळप्रश्नी  ३५ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. शुक्रवारी (दि. १४) उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.

पवार उद्या मोर्चात
दुष्काळप्रश्नी  ३५ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत. शुक्रवारी (दि. १४) उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.