आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गॅसच्या किंमती उतरल्याने विना अनुदानित गॅस सिलेंडरच्या दरात ५३.५० रुपयांने कपात करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे. स्वयंपाकाचा १४.२ किलो वजनाचे अनुदानित १२ सिलेंडर नंतर खरेदी केल्यानंतर दिल्लीतील गॅसधारकांना पुढील प्रत्येक सिलेंडर १,१३४ ऐवजी आता १,०८० रुपयाला मिळेल.
गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पेट्रोलियम मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. मात्र आता विना अनुदानित गॅस सिलेंडरचे दर सुमारे दिडशे रुपयाने कमी झाले आहेत.

Story img Loader