जगभरात करोनाने थैमान घातलेलं असताना मागील २ वर्षांपासून उत्तर कोरिया आमच्या देशात करोनाचा एकही रुग्ण नाही असा दावा करत होतं. मात्र, आता त्याच उत्तर कोरियाने देशात अखेर करोना संसर्ग झाल्याचं अखेर मान्य केलं. यानंतर उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किम जोंग उनही मास्क घालताना दिसले आहेत. त्यांचे मास्क घालून बैठकीला बसल्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

उत्तर कोरियात तापाची लक्षणं आढळणाऱ्या नागरिकांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या. यात काही लोकांना ओमायक्रॉन करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किंम जोंग उन यांनी संपूर्ण देशात निर्बंध लादले आहेत. कामाची ठिकाणीही पाळायचे नियम जारी करून संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेत.

उत्तर कोरियातील २ कोटी ६० लाख लोकसंख्या अद्याप करोना लसीकरणापासून वंचित आहे. त्यामुळे उत्तर कोरियात करोना संसर्गाने हातपाय पसरले तर किम जोंग उन यांची काळजी वाढणार आहे.

हेही वाचा : उत्तर कोरियात पहिला करोना रुग्ण आढळल्यानंतर सहा जणांचा मृत्यू; १ लाख ८७ हजारांहून अधिक लोक विलगीकरणात

विशेष म्हणजे लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी सैन्यावर आणि शस्त्रास्त्रांवर प्रचंड खर्च करणाऱ्या उत्तर कोरियात आरोग्य यंत्रणा अत्यंत कमकुवत आहे. त्यामुळे कंबरडे मोडलेल्या आरोग्य यंत्रणेच्या आधारे उत्तर कोरिया करोनाचा सामना कसा करणार याविषयी काळजी व्यक्त केली जात आहे.

Story img Loader