युक्रेनमधील रशियन हल्ल्याने जग आधीच हैराण झालं आहे. मात्र आता आणखी एका हुकूमशहाने विनाशकारी क्षेपणास्त्र डागून संपूर्ण जगाला संकटात टाकलं आहे. उत्तर कोरियाने रविवारी समुद्रात बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागले असून या क्षेपणास्त्राचे थेट लक्ष्य जपान आहे. उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीनंतर अमेरिकेवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. युक्रेनच्या संकटाकडे अमेरिकेचं लक्ष वेधलं गेलं असताना, हुकूमशहा किम जोंग उन याचा जबरदस्त फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जाते.

यावेळी उत्तर कोरियाने प्रक्षेपित केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र या वर्षातील आठवे आणि ३० जानेवारीनंतरचे पहिले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचणी होते. काही तज्ञांनी असे म्हटले आहे की उत्तर कोरिया आपले शस्त्र तंत्रज्ञान परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे आणि उत्तर कोरिया आता अमेरिकेवर त्याच्यावरील निर्बंध उठवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Pakistan professor claims India is developing Surya missile
अर्धी पृथ्वी टप्प्यात येईल असे ‘सूर्या’ क्षेपणास्त्र भारताकडे खरेच आहे का? पाकिस्तानी तज्ज्ञाचा दावा काय?
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
ukraine israel war increase carbon emissions
युक्रेन, इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ
Putin Ukraine hating Donald Trump victory hit Europe How long will Ukraine stand strong in front of Russia
पुतिनमित्र, युक्रेनद्वेष्टे ट्रम्प यांच्या विजयाने युरोपला धडकी… रशियासमोर युक्रेन किती काळ तग धरणार?
Strategies to Counter Terrorism Amit Shah statement at the conference of National Investigation Agency
दहशतवादाचा सामना करण्याची रणनीती; राष्ट्रीय तपास संस्थेच्या परिषदेत अमित शहा यांचे प्रतिपादन

उत्तर कोरिया आता अमेरिकेसोबत निःशस्त्रीकरणासाठी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की युक्रेनच्या संकटामुळे अमेरिकेवर प्रचंड दबाव आहे आणि उत्तर कोरिया युक्रेनच्या संकटाचा फायदा घेऊन अमेरिकेवर अधिक दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून अमेरिका त्याच्याशी वाटाघाटी करण्यास तयार आहे.