उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्या अनेक सुरस कथा नेहमी समोर येत असतात. नावापुरती लोकशाही असलेल्या उत्तर कोरियात किम जोंग उनची मोठी दहशत आहे. युद्धाची चिथावणी देण्यापासून ते छोट्या छोट्या कारणांसाठी जवळच्या व्यक्तींचाही खात्मा करण्यासाठी मागे पुढे न पाहणारा हुकूमशहा म्हणून किम जोंग उनची ओळख आहे. आता उत्तर कोरियातून पळालेल्या आणि सध्या अमेरिकेत युट्यूबर आणि लेखिका झालेल्या एका मुलीने खळबळजनक दावा केला आहे. येओन्मी पार्क असे या मुलीचे नाव असून तिने केलेला आरोप ऐकून डोकं चक्रावून जाईल.

दरवर्षी २५ सुंदर मुलींची भरती

येओन्मी पार्क यांनी सांगितले की, किम जोंग उन यांच्या आनंदासाठी दरवर्षी २५ सुंदर कुमारीकांची (virgin girls) भरती केली जाते. मुलींच्या या पथकाला ‘प्लेजर स्कॉड’ असे संबोधले जाते. येओन्मी पार्क लहान असतानाच उत्तर कोरियातून पळून गेली. तिने सांगितले की, या २५ मुलींची भरती करण्यासाठी विविध निकष लावले जातात. शारीरिक सुंदरता, तसेच कुटुंबाची पार्श्वभूमी पाहिली जाते.

…आणि हुकुमशाह किम जोंग-उन भर सभागृहात रडू लागले; नेमकं कारण काय ठरलं? पाहा Video!

येओन्मी पार्क पुढे सांगतात की, प्लेजर स्कॉडसाठी त्यांचीही दोन वेळा प्राथमिक निवड झाली होती. मात्र कौटुंबिक पार्श्वभूमी निकषात न बसल्यामुळे त्यांना अंतिम २५ मध्ये दाखल होता आले नाही. मुलींची भरती करण्यासाठी किम जोंग उनचे अधिकारी शाळांमध्ये नेहमीच दौरे करत असतात. त्यांनी सुंदर मुली हेरल्यानंतर आधी मुलींची कौटुंबिक पार्श्वभूमी तपासली जाते. त्यांचे राजकीय मत काय आहे, याचीही माहिती करून घेतली जाते. जर एखाद्या मुलीचे कुटुंबिय उत्तर कोरियातून पळाले असतील किंवा त्यांचे नातेवाईक दक्षिण कोरियात किंवा अन्य देशांत असतील, अशा मुलींना या स्कॉडमध्ये घेतलं जात नाही.

pleasure squad yeonmi park
येओन्मी पार्क यांनी स्वतःचे आत्मचरित्र प्रकाशित केले आहे.

सुंदर मुलींची होते कौमार्य चाचणी

द डेली स्टार या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये येओन्मी पार्क यांनी ही सुरस कथा सांगितली आहे. पार्क यांनी किम जोंग उन यांच्या अंतर्गत वर्तुळातील अनेक रहस्य उघड केले आहेत. प्लेजर स्कॉड संबंधी अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, मुलींची निवड केल्यानंतर त्यांची कौमार्य चाचणी केली जाते. तसेच इतर वैद्यकीय तपासण्या केल्या जातात. शरीरावर एखादा लहानसा चट्टा जरी असेल तर त्या मुलींना अपात्र ठरविले जाते. संपूर्ण उत्तर कोरियातून निवडलेल्या मुलींना अखेर प्योंगयांगमध्ये आणले जाते, जिथे त्यांना वर्षभर किम जोंग उन यांना आनंद द्यायचा असतो किंवा ते म्हणतील तसं वागायचं असतं.

किम जोंग-उनचा नवा कारनामा; ६५३ गोळ्यांसाठी अख्खं शहरच बंद केलं! दारोदार हिंडतायत कोरियन सैनिक!

प्लेजर स्कॉडची संकल्पना कुणाची?

पार्कने पुढे सांगितले की, प्लेजर स्कॉड ही संकल्पना १९७० च्या दशकात उदयास आली. किम जोंग उन यांचे वडील किम जोंग-इल यांनी त्यांचे वडील किम इल-सुंग (किम जोंग उन यांचे आजोबा) यांना खुश करण्यासाठी आणि स्वतःला उत्तराधिकारी नेमावे यासाठी ही संकल्पना राबविली. द डेली स्टारने दिलेल्या बातमीनुसार, काळानुरूप प्लेजर स्कॉड या संकल्पनेत आणखी बदल होत गेले. किम जोंग-इल हे अधिक उंच असलेल्या महिलांना पसंती देत होते. तर किम जोंग-उन हे कमी उंचीच्या, सडपातळ आणि पाश्चात्याप्रमाणे दिसणाऱ्या मुलींना पसंती देतात.

yeonmi park pleasure squad
येओन्मी पार्क या युट्यूबर असून त्यांना गोल्डन बटन मिळालेले आहे.

“मुलांनी हॉलिवुडचा चित्रपट बघितला, तर ६ महिने कारावास”, उ. कोरियाचा हुकुमशाह किम जोंगचं पालकांना अजब फर्मान!

प्लेजर स्कॉडमधील मुली काय करतात?

प्लेजर स्कॉडमधील मुलींना विविध टास्क दिलेले असतात. त्यांची विभागणी तीन गटात होते. एका गटाला मसाज करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दुसरा किम जोंग उन आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनोरंजन करण्यासाठी तैनात केला जातो. तिसऱ्या गटाला लैंगिक सुखासाठी राखून ठेवले जाते. किम जोंग उन आणि त्यांच्या खास अधिकाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी हे पथक काम करते.

Story img Loader