जपान आणि ग्वाम येथील असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करण्याची धमकी उत्तर कोरियाने गुरुवारी दिली.
दक्षिण कोरियाच्या प्रसारण कंपन्यांवर आणि बँकांवर करण्यात आलेल्या सायबर हल्ल्यांमागे उत्तर कोरियाच असल्याचा संशय त्यामुळे बळावला आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी कारवाईत आण्विक क्षमतापूर्ण बी-५२ बॉम्बर आणि आण्विक पाणबुडीचा वापर करण्यात आल्याने उत्तर कोरिया त्रस्त झाला आहे. उत्तर कोरियाने जपानपर्यंत पोहोचू शकणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे.