आपल्या मुलाचा छळ केल्यावरून दीड वर्षांपर्यंत तुरुंगवासाची सजा झालेल्या नॉर्वेतील चंद्रशेखर वल्लभनेनी आणि अनुपमा या भारतीय दाम्पत्याने जिल्हा न्यायालयाच्या निकालाविरोधात वरिष्ठ न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली आहे. ओस्लो जिल्हा न्यायालयाने मंगळवारी चंद्रशेखरन यांना दीड वर्षांची तर त्यांच्या पत्नी अनुपमा यांना पंधरा महिन्यांची सजा ठोठावली होती. या दोघांनी आपल्या मुलाला गरम चमच्याने किंवा अन्य तापलेल्या वस्तूने चटके दिले. एकदा तर या दोघांनी मुलाच्या जिभेला चटका द्यायचीही भीती घातली होती, असे न्यायालयाने निकालात नमूद केले होते. न्यायालयाच्या या निकालाविरोधात या दोघांनी वरिष्ठ न्यायालयात याचिका केली असून तिची सुनावणी गुरुवारीच सुरू होण्याची शक्यता आहे.   

Story img Loader