एपी, स्टॉकहोम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नॉर्वेमधील लेखक युआन फोस यांना यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला. स्टॉकहोम येथे गुरुवारी स्विडिश अकादमीने यासंबंधी घोषणा केली. फोस यांची ‘नावीन्यपूर्ण नाटके आणि गद्यलेखन’ यासाठी त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असे पुरस्कार समितीने सांगितले.

युआन फोस यांच्या कादंबऱ्या आणि लहान मुलांसाठी लिहिलेली पुस्तकेही मोठय़ा प्रमाणात वाखाणली गेली आहेत. त्यांच्या कथानक आणि भाषेमध्ये नॉर्वेच्या पार्श्वभूमीची पाळेमुळे दिसून येतात असे पुरस्कार समितीचे अँड्रेस ओस्लोन म्हणाले. फोस यांनी ४० नाटके व कादंबऱ्या, लघुकथा, लहान मुलांची पुस्तके, कविता आणि ललित निबंध लिहिले आहेत. ‘नोबेल समितीचा आपल्याला फोन आल्यानंतर फार आनंद झाला’, अशी प्रतिक्रिया फोस यांनी नॉर्वेची वृत्तसेवा एनआरकेशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा >>>भरधाव वेगाने आलेल्या प्रवासी बसने तोडला सिग्नल, अन् थेट कारला दिली धडक, थरारक अपघात Video व्हायरल

फोस यांच्या लिखाणातून अव्यक्त भावनांना शब्दरूप मिळते असा गौरव अकादमीने केला. अकादमीचे कायमस्वरूपी सचिव मॅट्स माल्म यांनी फोस यांच्या नावाची घोषणा केली. नोबेल पुरस्काराची रक्कम ११० लाख स्विडिश क्रोनर (१० लाख डॉलर) इतकी आहे. त्याशिवाय पुरस्कारप्राप्त विजेत्यांना डिसेंबरमध्ये होणाऱ्या पुरस्कार सोहळय़ात १८ कॅरेटचे सुवर्णपदक आणि डिप्लोमाही प्रदान केला जाईल.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Norwegian nobel prize in literature to euan foss amy
Show comments