काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला कन्याकुमारी येथून सुरुवात झाली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधींच्या हाती तिरंगा ध्वज सोपवल्यानंतर ही यात्रा सुरुवात झाली.
यावेळी राहुल गांधी यांना आपल्या भाषाणातून भाजपावर जोरदार टीका केली, ते म्हणाले, “या सुंदर ठिकाणाहून भारत जोडो यात्रा सुरू करताना मला खूप आनंद होत आहे. राष्ट्रध्वज हा या देशात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा धर्म आणि भाषा दर्शवतो. मात्र त्यांना (भाजपा आणि आरएसएस) वाटते की हा झेंडा त्यांची वैयक्तिक मालमत्ता आहे.”
भाजपावर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले, “त्यांना (भाजपा) वाटते की ते सीबीआय, ईडी आणि आयटीचा वापर करून विरोधकांना घाबरवू शकतात. मात्र ते भारतीय नागरिकांना ओळखत नाहीत. भारतीय घाबरत नाहीत. एकही विरोधी पक्षाचा नेता भाजपाला घाबरणार नाही.”
नितीश कुमार सोनिया गांधींना भेटणार ; म्हणाले, “गरज पडल्यास आम्ही…”
“आज भारत सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मूठभर मोठे उद्योग आज संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवतात. पूर्वी भारतावर नियंत्रण ठेवणारी ईस्ट इंडिया कंपनी होती आणि आज संपूर्ण भारताला तीन-चार मोठ्या कंपन्या नियंत्रीत करत आहेत,” असं देखील यावेळी राहुल गांधी यांनी म्हटलं.