अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना सुरक्षेच्या कारणास्तव आयफोन वापरू दिला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हाईट हाऊसमध्ये युवकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ओबामा बोलत होते. यावेळी त्यांना सुरक्षेच्या कारणात्सव आयफोन वापरण्यावर बंदी असल्याचे म्हटले.
बराक ओबामा म्हणाले की, “माझ्या दोन मुलांना साशा आणि मलिया या अॅपलच्या आयफोनवर बराच वेळ घालविता येतो. पण, मला सुरक्षेच्या कारणास्तव आयफोन वापरू दिला जात नाही. मी फक्त अॅपलचा टॅब आणि आयपॅड वापरतो. मला माझ्या फोनचे बिल किती येते हे सुद्धा माहित नाही. माझ्या मते, आपल्यापैकी अनेक जण मोठ्या प्रमाणात पैसे मोबाईलचे बिल भरण्यात घालवत असतील.” असेही ओबामा म्हणाले.
त्याचबरोबर ओबामा यांचा वैयक्तीक ई-मेल पत्ता नेमक्या दहा जणांना देण्यात आला आहे. इतर कोणालाही बराक ओबामांचा वैयक्तीक ई-मेल पत्ता माहिती नाही. देशाचे प्रतिनिधीत्व करणारे व्यक्तीमत्व असल्याने माझ्या बाबतीत इतकी सुरक्षा बाळगली जाते असेही ओबामा म्हणाले.
‘मला आयफोन वापरू दिला जात नाही’
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना सुरक्षेच्या कारणास्तव आयफोन वापरू दिला जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे
First published on: 05-12-2013 at 11:24 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not allowed iphone for security reasons barack obama