अन्न सुरक्षेस आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांचा पाठिंबा मिळत असून या मुद्दय़ावर कोणतीही तडजोड होणार नाही, असे भारताने बुधवारी जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत स्पष्ट केले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी भारताची भूमिका मांडली.
आज कृषी व्यवसायावर लक्षावधी शेतकरी अवलंबून असून त्यांच्या हिताचे रक्षण झाले पाहिजे. जगभरातील चार अब्जांहून अधिक लोकांसाठी अन्न सुरक्षा आवश्यकच आहे, असे शर्मा यांनी ठामपणे नमूद केले. भारतासाठी अन्न सुरक्षेच्या मुद्दय़ावर तडजोड होऊच शकत नसल्याचे सांगतानाच जागतिक व्यापार संघटनेच्या काही नियमांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यावर शर्मा यांनी भर दिला.
अन्न सुरक्षेच्या मुद्दय़ावर भारताने घेतलेल्या ठाम भूमिकेसंदर्भात चीन आणि इंडोनेशियासारख्या देशांनी आपले मत बदलले असले तरी आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेतील नव्या सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा दिला आहे, याकडे शर्मा यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा