राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि माझ्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी स्पष्ट केले आहे. ते पंचायत आजतक कार्यक्रमात बोलत होते. वसुंधरा राजे आणि तुमच्यामध्ये मतभेद आहेत का ? या प्रश्नावर शाह म्हणाले की, आमच्यामध्ये कुठलीही अंतर्गत स्पर्धा नाही.

वसुंधरा राजे यांनी कधीही पक्षादेश झुगारलेला नाही. त्यांनी नेहमीच पक्षाच्या निर्णयांचे पालन केले आहे असे ते म्हणाले. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार महत्वाच्या टप्प्यावर असताना अमित शाह यांनी वसुंधरा राजेंबरोबरच्या मतभेदाच्या मुद्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

राजस्थानमध्ये ७ डिसेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. ११ डिसेंबरला एकूण पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या विधानसभा निवडणुकांकडे पुढच्यावर्षी २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे.

Story img Loader