गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी आज उत्तरप्रदेशमधील  कानपूर येथील जाहीर सभेत यूपीए सरकारवर चौफेर टीका केली. राहूल गांधी यांच्यावर  टिकेची झोड उठवत सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेल्यांना देशातील गरीबी कळनार नाही असे म्हटले.
गेल्या साठ वर्षांपासून काँग्रेस देशाची फसवणूक करते आहे. या सरकारला हाणून पाडणे तुमच्या हातात आहे. त्यामुळे एक पाऊल उचला आणि येत्या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्या असे आवाहनही मोदींनी उत्तरप्रदेश जनतेला केले.
मोदी म्हणाले, “सध्या देशात काँग्रेस विरोधात संतापाचे वातावरण आहे. फसवणूक करण्यात हे सरकार तरबेज आहे. कोळसा घोटाळा देशात झालाच कसा? फाईल हरवलीच कशी? फाईल नाही, केंद्र सरकारचं हरवले आहे असेही नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधानांना यावर दोषी ठरवत या कोळसा घोटाळ्यात पंतप्रधानांचेही हात काळे झाले असल्याचे मोदी म्हणाले.
उत्तरप्रदेशात गेल्या एका वर्षात पाच हजार निष्पाप नागरिक मारले गेले अशी आकडेवारी सादरकरून मोदींनी उत्तरप्रदेशाला ढासळलेल्या प्रशासनाचे प्रशस्तीपत्रक दिले. गुजरातमध्ये उत्तरप्रदेशातील तरूण येवून काम करु इच्छितो. उत्तरप्रदेशात प्रगती सरकारला करता आली नाही. त्यामुळे येथील तरुण दिशाहीन झाले आहेत. असेही मोदी म्हणाले.

उत्तरप्रदेशातील या सभेतील मोदींचे टीकास्त्र-

* राहुल गांधींनी गरिबांची खिल्ली उडविली
* कोळसा घोटाळ्याची फाईल नाही, केंद्र सरकारच हरवलंय
* महागाईवर पंतप्रधान, सोनिया आणि राहुल यांची गुपचिळी का?
* अन्नसुरक्षा विधेयकातून देशाची फसवणूक; विधेयकातून मिळणारे अन्न गरजेपेक्षा कमी