पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी अल कादिर ट्रस्टच्या प्रकरणात अटक करण्यात आली. पाकिस्तानात तेव्हापासून अनागोंदी माजली आहे. मात्र पाकिस्तानात एखाद्या माजी पंतप्रधानांना अटक करण्याची ही काही पहिली वेळ नाही. इम्रान खान यांच्यासह सात माजी पंतप्रधानांना पाकिस्तानमध्ये अटक झाली आहे. जुल्फिकार अली भुट्टो यांना तर फासावर लटकवण्यात आलं होतं. आपण जाणून घेऊ हे माजी पंतप्रधान कोण कोण होते आणि काय काय घडलं होतं?

भारताचा शेजारी देश असलेल्या आणि भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तान या देशात आर्थिक संकट आलं आहे आणि अनागोंदी माजली आहे. अशातच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मंगळवारी अटक झाली. यानंतर पाकिस्तान तहरीक ए इन्साफ म्हणजेच पीटीआयच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरु केलं आहे. मात्र पाकिस्तानच्या राजवटीत आत्तापर्यंत असे अनेक माजी पंतप्रधान झाले ज्यांना अटक करण्यात आली होती.

Tuljapur Devanand Rochkari, Tuljapur, Dheeraj Patil,
तुळजापुरात मैत्रीपूर्ण लढत की, आघाडीत बिघाडी? मविआचा अधिकृत उमेदवार कोण? रोचकरी की, पाटील?
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
maharashtra vidhan sabha election 2024 Sanjay Puram vs Rajkumar Puram in Amgaon-Devari constituency
आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?
Asaduddin Owaisi Statement over Modi
Asaduddin Owaisi : “आंबेडकर जिंदा है तो गोडसे…”, असदुद्दीन ओवैसींची पंतप्रधान मोदींच्या विधानावर जोरदार टीका

हुसैन शहीद सुहरावर्दी

पाकिस्तानमध्ये ज्यांना कायदे आझम असं म्हटलं जायचं त्या मोहम्मद अली जिना यांचे निकटवर्तीय असलेले हुसैन शहीद सुहरावर्दी हे सप्टेंबर १९५६ ते ऑक्टोबर १९५७ या कालावधीत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यांनी जनरल अयूब खान यांच्या सरकारला पाठिंबा देण्यास मनाई केली होती. १९६०मध्ये कायद्याचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत हुसैन शहीद यांना अटक करण्यात आली. त्यांना कराचीच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आलं होतं.

जुल्फिकार अली भुट्टो

जुल्फिकार अली भुट्टो हे ऑगस्ट १९७३ ते जुलै १९७७ या कालावधीत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. १९७४ मध्ये त्यांनी आपल्या राजकीय विरोधकाच्या हत्येचा कट रचला हा आरोप ठेवत त्यांना सप्टेंबर १९७७ मध्ये अटक कऱण्यात आली. लाहोर उच्च न्यायालयाने त्यांना मुक्त केलं. या आरोपाला काही अर्थ नाही असं न्यायालयाने म्हटलं होतं. मात्र मार्शल लॉ रेग्युलेशन १२ च्या अंतर्गत त्यांना सुटका झाल्यानंतर तीन दिवसांनी पुन्हा अटक करण्यात आली. ४ एप्रिल १९७९ ला जुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी दिली गेली.

बेनझीर भुट्टो

बेनझीर भुट्टो या १९८८ ते १९९० आणि १९९३ ते १९९६ या कालावधीत दोनवेळा पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या. १९९९ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपात त्यांना अटक करुन पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर सात वर्षे त्या निर्वासित म्हणून आयुष्य जगल्या. मात्र २००७ मध्ये जेव्हा त्या आपल्या देशात म्हणजे पाकिसानात परतत होत्या तेव्हा आत्मघातकी हल्ल्यात त्यांची हत्या करण्यात आली.

युसूफ रजा गिलानी

युसूफ रजा गिलानी हे २००८ मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान होते. त्यांच्याविरोधातही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. त्यांच्याविरोधात अरेस्ट वॉरंटही लागू करण्यात आला होता. बनवाट कंपन्यांच्या नावांनी गिलानी यांनी भ्रष्टाचार केला असा हा आरोप होता. २०१२ मध्ये त्यांना पद सोडावं लागलं होतं.

नवाज शरीफ

नवाज शरीफ हे १९९०, १९९७ आणि २०१३ अशा तीनवेळा पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. मात्र लष्कर प्रमुख परवेझ मुशरर्फ यांच्या सरकारच्या काळात शरीफ यांना १० वर्षे निर्वासित म्हणून रहावं लागलं. पाकिस्तानला परतल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. निर्वासनाचा पुढचा काळ पूर्ण करण्यासाठी सौदीला पाठवण्यात आलं.

शाहिद खाकन अब्बासी

शाहीद खाकन अब्बासी जानेवारी २०१७ ते मे २०१८ या कालावधीत पाकिस्तानचे पंतप्रधान होते. २०१९ ला अब्बासी यांना अटक करण्यात आली. २०२० मध्ये त्यांना जामीन मंजूर झाला.

इम्रान खान

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना ९ मे २०२३ ला अटक करण्यात आली. भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना अटक करण्यात आली आहे. ज्यामुळे अनागोंदी माजलेलल्या पाकिस्तानची परिस्थिती आणखी चिघळली. त्यानंतर पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाच्या लोकांनी आंदोलनही केलं. मात्र ही अटक टळली नाही.