केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सोमवारी मी एवढ्यात निवृत्ती घेणार नसल्याचे स्पष्ट केले. सध्या निवृत्त होण्याचा माझा कोणताही विचार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली जबाबदारी पार पाडल्यानंतरच मी गोव्याला परत जाईन, असे त्यांनी सांगितले.
वयाच्या साठीनंतर लोकांनी आपल्या निवृत्तीचा विचार करायला हवा. मी येत्या १३ डिसेंबरला साठ वर्षांचा होतोय. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच यासंदर्भात विचार करणं सुरू केलं होतं, या विधानामुळे पर्रिकर राजकारणातून निवृत्त होत असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र, पर्रिकरांनी माझ्या या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगितले. मी निवृत्त होणार आहे, असे कोणतेही विधान केले नसल्याचे त्यांनी म्हटले.
गोव्यातील मापुसा शहरात रविवारी लोकमान्य को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या कार्यक्रमात बोलताना पर्रिकर म्हणाले होते की, सध्या तरी कोणतीही मोठी जबाबदारी स्विकारण्यात मला रस नाही. गोव्यासारख्या छोट्या राज्यांतून चांगल्या गुणवत्तेचे नेते कमी तयार होतात याची कबुली देत राजकारण सोडल्यानंतरही गोव्यावर लक्ष देणार असल्याचे मनोहर पर्रिकर यांनी सांगितले होते. छोट्या राज्यांतून दर्जेदार नेते तयार होण्याची शक्यता कमी असते ही वस्तुस्थिती आहे. पण, राज्य चुकीच्या मार्गावर जात असेल तर योग्य मार्ग दाखवण्याची माझी जबाबदारी आहे आणि ती मी वेळोवेळी पार पाडेन, असेही पर्रिकर म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा