आपण राजकारणात नाही. त्यामुळे नमो…नमो…करणे हे आपले काम नाही, असे स्पष्ट करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपसाठी काम करताना संघाच्या कार्यकर्त्यांनी आपली मर्यादा पाळावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेंगळुरूमध्ये कार्यकर्त्यांपुढे केलेल्या भाषणात भागवत यांनी मोदींच्या प्रचारात मर्यादा ओलांडू नका, अशा आशयाचा सल्लाच दिला आहे. भागवत म्हणाले, नमो…नमो…करणे आपले काम नाही. आपल्याला लक्ष्य गाठण्यासाठी काम करायचे आहे. काम करताना आपली मर्यादा ठरलेली आहे. कोणत्याही स्थितीत ती मर्यादा आपल्याला ओलांडायची नाहीये.
भाजपचा संपूर्ण प्रचार एका व्यक्तीभोवती केंद्रित झाला आहे. मात्र, अशा प्रचारापासून संघाच्या कार्यकर्त्यांना चार हात लांबच राहावे, असेही भागवत म्हणाले. संघाच्या मुक्तचिंतन बैठकीत संघाच्या विविध नेत्यांनी मांडलेल्या विचारांवर आपले मत मांडताना भागवत यांनी वरील मुद्द्यांना हात घातला. संघाच्या देशस्तरावरील समन्वयकांमध्येही मोदींच्या प्रचारावरून विविध शंका उपस्थित केल्या जात होत्या. त्यालाही सरसंघचालकांनी उत्तर दिले आहे.
सारखं ‘नमो, नमो’ करणं संघाचं काम नाही – सरसंघचालक
आपण राजकारणात नाही. त्यामुळे नमो...नमो...करणे हे आपले काम नाही, असे स्पष्ट करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपसाठी काम करताना संघाच्या कार्यकर्त्यांनी आपली मर्यादा पाळावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 11-03-2014 at 11:15 IST
TOPICSआरएसएसRSSमोहन भागवतMohan Bhagwatलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Not rss job to chant namo namo