प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारुवाला यांचं करोना संसर्ग झाल्याने निधन झालं आहे. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्विट करुन यासंदर्भातली माहिती दिली. अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. एका आठवड्यापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत होता. आज त्यांची प्राणज्योत मालवली.

बेजान दारुवाला हे सुप्रसिद्ध ज्योतिषी होते. ज्योतिष क्षेत्रात त्यांचं कार्य खूप मोठं होतं. त्यांचा जन्म ११ जुलै १९३१ ला झाला होता. पारशी समाजाचे असूनही ते गणपतीचे भक्त होते. पारंपरिक ज्योतिष, पाश्चिमात्य ज्योतिष, टॅरो कार्ड, अंकशास्त्र, हस्तरेखा शास्त्र या विषयांमध्ये त्यांचा गाढा अभ्यास होता. अनेक वृत्तपत्रं, टीव्ही चॅनेल्स यांवर ते भविष्य सांगत. आज अहमदाबादमध्ये एका रुग्णालयात त्यांचं निधन झालं.

 

Story img Loader