आंतरराष्ट्रीय योगदिनी ओमच्या उच्चारणावरून उठलेल्या वादळादरम्यान उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी ओम उच्चारणात काहीही गैर नसल्याची प्रतिक्रिया दिली. ओमच्या उच्चारणात काहीही गैर नसल्याचे सांगत, तुम्ही अल्ला, गॉड किंवा रब उच्चारत नाही का? असा प्रतिप्रश्न विचारला. यात काय फरक आहे, अशी विचारणादेखील त्यांनी केली. सर्वांना योग करण्याचा सल्ला देताना त्या म्हणाल्या, योग करण्यास विरोध करणे चुकीचे आहे. योग केल्यामुळे अधिक मात्रेत ऑक्सिजन मिळतो. योग केल्याने शरीर निरोगी राहते. जर मी योग केला नसता तर माझ्या शरीरातील काही हाडे ठिसूळ झाली असती. योग केल्याने शरीर सुदृढ राहते. मीसुध्दा योग करते. सरकार हिंदुत्व अजेंडावर काम करत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी योग दिनी सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने ओमचे उच्चारण करण्याच्या सरकारच्या प्रस्तावास विरोध दर्शविला आहे.