इराकचे पंतप्रधान नूरी अल मलिकी यांनी काही राजकीय उपाययोजना मान्य केल्या असल्या तरी सुन्नी अतिरेक्यांचे आक्रमण थोपवण्याशिवाय गत्यंतर नाही. अतिरेक्यांच्या कारवायांमुळे इराकचे तुकडे होण्याची भीती नाकारता येत नाही. दरम्यान, इराकने अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी रशियाकडून जेट विमाने घेतली आहे.
काही लष्करी सल्लागारांना प्रत्यक्ष कामगिरीवर पाठवले आहे. मलिकी यांनी अलीकडेच ब्रिटनचे परराष्ट्रमंत्री विल्यम हेग यांच्याशी चर्चा केली. इराकी नेत्यांमध्ये एकजूट असेल तरच अतिरेक्यांना तोंड देता येईल असे हेग यांनी इराकी पंतप्रधानांना सांगितले. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हान्ट म्हणजेच इसिल या संघटनेने आतापर्यंत ११०० बळी घेतले असून लाखो लोक विस्थापित झाले आहेत. इराकी दलांनी तिक्रीत येथे हेलिकॉप्टरच्या मदतीने हल्ला केला. कुर्दिश स्वायत्त विभागाने किरकुकवर दावा सांगितला आहे.

Story img Loader