काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार टीका केली. “स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ जनतेवर अन्याय आहे. मोदी सरकार प्रत्येकाला लुटण्यात व्यस्त आहे” असं म्हणत बुधवारी (१ सप्टेंबर) त्यांनी जीडीपीवरून (GDP) देखील केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावर आता मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “राहुल गांधींना जीडीपीच्या अर्थ काय कळणार”, असा सवाल करत त्यांच्या जीडीपीचा नवा अर्थ सांगितला आहे.

“राहुल गांधींसाठी G म्हणजे गांधी (सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी), D म्हणजे त्यांचे राजकीय गुरू दिग्विजय सिंह, P म्हणजे पी. चिदंबरम. मग राहुल गांधींना जीडीपीचा अर्थ काय कळणार?”, असा टोला नरोत्तम मिश्रा यांनी राहुल गांधींवर टीका करताना लगावला आहे. राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीका करताना आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं कि, “GDP त वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किमतीत वाढ आहे.”

GDP त वाढ म्हणजे Gas, Diesel, Petrol च्या किमतीत वाढ; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

२३ लाख कोटी रुपये गेले कुठे?

“आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांच्या व गॅसच्या किमतीमध्ये २०१४ च्या तुलनेत घटच झाली, परंतु प्रत्यक्षात मात्र पेट्रोल. डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत मात्र भरमसाठ वाढ करून मोदी सरकारनं तब्बल २३ लाख कोटी रुपये जनतेच्या खिशातून गोळा केले आहेत, ते गेले कुठे”, असा प्रश्न राहुल गांधींनी विचारला आहे.

GDP Failure : मोदींनी काँग्रेसकडे यावं, आमचे अर्थतज्ज्ञ मदत करतील – राहुल गांधी

सिलिंडरची किंमत ११६ टक्क्यांनी वाढली

काँग्रेस नेते राहुल गांधी महागाईच्या मुद्द्यावर म्हणाले, “२०१४ मध्ये नरेंद्र मोदी म्हणाले होते की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत आहेत. २०१४ मध्ये जेव्हा यूपीए सरकार बाहेर पडलं तेव्हा सिलेंडरची किंमत ४१० रुपये होती आणि आज सिलेंडरची किंमत ८८५ रुपयांवर गेली आहे. सिलेंडरच्या किमतीत ११६% टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१४ पासून पेट्रोलच्या किंमतीत ४२ % आणि डिझेलच्या किमतीत ५५% वाढ झाली आहे.

Story img Loader