विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता माध्यान्ह भोजनात चक्क बेडूक आढळून आल्याची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेश मधील मोरादाबाद आणि चित्राकूट जिल्ह्यातील दोन प्राथमिक शाळांच्या माध्यान्ह भोजनात मृत बेडूक आढळून आले आहेत. याआधी मृत पाल आणि किटक माध्यान्ह भोजनात आढळून आले होते. त्यानंतर आता माध्यान्ह भोजन म्हणून देण्यात आलेल्या खिचडीमध्ये मृत बेडूक सापडले. तसेच ही खिचडीमुळे चार विद्यार्थ्यी आजारी पडल्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
घटनेची दखल घेत उत्तरप्रदेशचे प्राथमिक शिक्षणमंत्री राम गोविंद चौधरी यांनी दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा दंडाधिकारींमार्फत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच “विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया माध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेची संपुर्ण जबाबदारी स्वयंपाकी आणि संबंधित शिक्षकांची असते. त्यानुसार स्वयंपाकी आणि शिक्षक या घटनेत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल” असेही राम गोविंद चौधरी यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 26th Jul 2013 रोजी प्रकाशित
आता हद्दच झाली, माध्यान्ह भोजनात आढळले बेडूक!
विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता माध्यान्ह भोजनात चक्क बेडूक आढळून आल्याची घटना समोर आली आहे.
First published on: 26-07-2013 at 12:16 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Now frogs in mid day meal in uttar pradesh