विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता माध्यान्ह भोजनात चक्क बेडूक आढळून आल्याची घटना समोर आली आहे. उत्तरप्रदेश मधील मोरादाबाद आणि चित्राकूट जिल्ह्यातील दोन प्राथमिक शाळांच्या माध्यान्ह भोजनात मृत बेडूक आढळून आले आहेत. याआधी मृत पाल आणि किटक माध्यान्ह भोजनात आढळून आले होते. त्यानंतर आता माध्यान्ह भोजन म्हणून देण्यात आलेल्या खिचडीमध्ये मृत बेडूक सापडले. तसेच ही खिचडीमुळे चार विद्यार्थ्यी आजारी पडल्यामुळे त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
घटनेची दखल घेत उत्तरप्रदेशचे प्राथमिक शिक्षणमंत्री राम गोविंद चौधरी यांनी दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा दंडाधिकारींमार्फत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच “विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱया माध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेची संपुर्ण जबाबदारी स्वयंपाकी आणि संबंधित शिक्षकांची असते. त्यानुसार स्वयंपाकी आणि शिक्षक या घटनेत दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल” असेही राम गोविंद चौधरी यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा