|| अनिकेत साठे

मानवरहित ‘सूचक’ यंत्रणा विकसित; लवकरच लष्करात दाखल होणार

Alpha beta gamma differences
कुतूहल : किरणोत्सारी खनिजे
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
GBS Pune, GBS, bacteria , private tankers, pune,
पुणे : १५ ठिकाणी खासगी टँकरच्या पाण्यातच जीवाणू असल्याचे उघड !
rava besan ladoo recipe in marathi
अगदी सोप्या पद्धतीने बनवा ‘रवा बेसन लाडू’, रेसिपी लगेच लिहून घ्या
Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
Navi Mumbai , Science Center ,
नवी मुंबई : शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या विज्ञान केंद्राचे ९० टक्के काम पूर्णत्वास
No bird flu death reported in Dhule but 27 Rapid Response Teams activated precaution
धुळ्यात ‘बर्ड फ्लू’ प्रादूर्भावापूर्वीच २७ पथके तैनात, कुक्कुट व्यावसायिकांना सूचना
Cancer causing chemicals on smart watches and bands
स्मार्टवॉच का ठरतंय जीवघेणं? नव्या अहवालातून धक्कादायक गोष्टी उघड

रासायनिक, जैविक, किरणोत्सारी अथवा आण्विक (सीबीआरएन) हल्ला झालाच तर धोकादायक क्षेत्रातील नमुना संकलन आणि परीक्षण करून त्या हल्ल्याचे स्वरूप स्पष्ट करण्यास साहाय्यभूत ठरणारी ‘मानवरहित सूचक यंत्रणा’ संरक्षण संशोधन आणि विकास प्रतिष्ठानच्या (डीआरडीओ) अहमदनगर येथील प्रयोगशाळेने विकसित केली आहे.

स्वदेशी बनावटीच्या या यंत्रणेमुळे जवानांना जीव धोक्यात घालावा लागणार नाही. ‘रिमोट कंट्रोल’च्या साहाय्याने ही यंत्रणा नियंत्रित करता येते. प्रत्येक घडामोडीची माहिती ती ऑनलाइन नियंत्रण कक्षाला पुरवते. या यंत्रणेद्वारे हल्ल्याचे स्वरूप समजले की, उपाय योजण्याचे काम तातडीने सुरू करता येते. या प्रणालीचा लष्करी गरजेनुसार अन्य कामांसाठी वापर करता येईल, असे संशोधन अधिकाऱ्यांनी सांगितले. लष्करासमोर ‘सूचक’चे सादरीकरण झाले आहे. लवकरच ती लष्करात दाखल होईल, असा विश्वास संशोधकांना आहे.

अहमदनगरच्या वाहने संशोधन आणि विकास केंद्राने (व्हीआरडीई) जमिनीवर प्रभावीपणे काम करण्याची क्षमता असणारी छोटेखानी सूचक (सीबीआरएन यूजीव्ही) यंत्रणा तयार केली आहे. काळानुरूप युद्धतंत्र बदलत आहे. भविष्यात रासायनिक, जैविक, किरणोत्सारी, आण्विक अर्थात ‘सीबीआरएन’ अस्त्रांचा वापर होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन केंद्राने फिरत्या ‘सीबीआरएन’ तपासणी आणि संवाद साधणाऱ्या (एमडीसी) वैशिष्टय़पूर्ण वाहनाची आधीच निर्मिती केली आहे. ‘सीबीआरएन’बाधित क्षेत्रात हे वाहन हल्ल्याचे स्वरूप ओळखून र्निजतुकीकरण आणि शुद्धीकरणाचे काम करते. वाहनात वातावरणातील रासायनिक घटकांचा वेध घेणारे सेंसर (संवेदक), र्निजतुकीकरणासाठी खास यंत्रणा, जनरेटर आदींचा अंतर्भाव आहे. यामध्ये आता ‘सूचक’ नव्याने समाविष्ट झाल्याचे केंद्राच्या संशोधन अधिकाऱ्यांनी सांगितले. तिचा नियंत्रण कक्ष ‘एमडीसी’ वाहनात आहे. बाहेरील घटकांचा प्रार्दुभाव न होता वाहनाच्या अंतर्गत भागात शुद्ध हवा पुरविणारी व्यवस्था आहे. मध्यंतरी नाशिकमध्ये ‘डिफेन्स हब’ची घोषणा करण्यात आली. तेव्हा ओझर येथील ‘एचएएल’च्या प्रांगणात आयोजित प्रदर्शनात ‘व्हीआरडीई’ने सूचक सादर केली.

‘सीबीआरएन’ अस्त्रांच्या वापराचा संशय असल्यास त्या ठिकाणी ‘सूचक’ शोध आणि मोजमाप करण्यासाठी वापरली जाईल. इमारत वा तत्सम अडचणीच्या ठिकाणी ‘एमडीसी’ वाहनाचा वापर करता येत नाही, तेथे सूचक प्रभावीपणे काम करू शकते. दूषित वातावरणात नमुना संकलन आणि रेखांकनाद्वारे बाधित क्षेत्राची माहिती देण्याचे कामही ही यंत्रणा करते. महत्त्वाची बाब म्हणजे, यानिमित्ताने ‘यूजीव्ही पे लोड’ (भार प्रणाली) विकसित झाले आहे.

अशी आहे ‘सूचक’

  • वेग कमाल ताशी सहा किलोमीटर
  • दिवसा-रात्री तपासणी, नमुना संकलन
  • ‘सीबीआरएन’बाधित क्षेत्राचे डिजिटल रेखांकन
  • सलग दोन तास काम करण्याची क्षमता
  • पायऱ्या चढणे-उतरणे, पाणी असणाऱ्या पृष्ठभागावर भ्रमंती
  • ५०० मीटर ते एक किलोमीटपर्यंत ‘रिमोट कंट्रोल’द्वारे नियंत्रण
  • नमुना संकलनासाठी यंत्रमानवाचे हात

Story img Loader