गुजरातमधील नरेंद्र मोदींच्या ‘नमो’ या टोपणनावाच्या लोकप्रियतेचा फायदा करून घेत गुजरातमधील काही व्यापाऱ्यांनी ‘स्मार्ट नमो’ हा नवीन मोबाइल फोन बाजारात आणायचे ठरवले आहे.  या मोबाइलचे नाव जरी ‘नमो’ असे असले तरीही त्याचे दोन अर्थ उत्पादकांना अभिप्रेत आहेत. एक म्हणजे अर्थातच नरेंद्र मोदी. पण दुसरा अर्थ आहे तो उत्पादकांच्या नावाचा संक्षेप. या मोबाइलच्या उत्पादकांच्या कंपनीचे नाव आहे ‘नेक्स्ट जनरेशन अँड्रॉईड मोबाइल ओडीसी’ (एनएएमओ). नरेंद्र मोदींचे आम्ही चाहते आहोत. म्हणूनच आम्ही आधुनिक भारताच्या या लोहपुरुषाला एक मोबाइल समर्पित करायचे ठरविले आहे. लवकरच आम्ही मोदी यांच्या स्वाक्षरीसह स्मार्ट फोन बाजारपेठेत आणणार आहोत, अशी माहिती या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Story img Loader