महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्यांना किंचित दिलासा देण्यासाठी पेट्रोलच्या दरात प्रति लिटरमागे ८५ पैशांनी, तर विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात तीन रुपयांनी कपात करण्याचा निर्णय सरकारने सोमवारी घोषित केला. या निर्णयामुळे मुंबईत आता पेट्रोल १.०७ रु.ने स्वस्त झाले असून त्याचा प्रति लिटर दर ७४.१४ रु. राहील. मुंबईत १४.२ किलो वजनाचा विनाअनुदानित गॅस सिलिंडर आता ९१२ रुपयांना मिळेल. पेट्रोलची ही दरकपात सोमवारी मध्यरात्रीपासूनच अमलात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पेट्रोलच्या दरात गेल्या दोन आठवडय़ांत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे.

Story img Loader