ख्यातनाम संगीतकार ए.आर.रेहमान यांना भाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी घरवापसीचे आमंत्रण दिले आहे. ए.आर.रेहमान जर घरवापसी करणार असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करू, असे वक्तव्य आदित्यनाथ यांनी केले आहे.
..मग मी अल्लाला काय उत्तर दिले असते- ए.आर.रेहमान
इराणमधील चित्रपट निर्माते माजिद माजिदी यांनी बनविलेल्या मोहम्मद पैगंबर यांच्यावरील एका चित्रपटाला संगीत दिल्याबद्दल रेहमान यांच्याविरोधात मुंबईतील रझा अकादमीने बहिष्काराचा फतवा काढला आहे. या फतव्याला प्रत्त्युतर देत रेहमान यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर या वादाबाबत स्पष्टीकरण देखील दिले होते. मात्र, या वादाचा मुद्दा पुढे करून आता देशात विविध स्तरांतून रेहमान यांना घरवापसीचे आवाहन केले जात आहे. खासदार आदित्यनाथ यांनीही हिंदू संघटनांच्या या मागणीला पाठिंबा देत रझा अकदामीच्या फतव्याची खिल्ली उडवली आणि रेहमान यांना ‘घरवापसी’बाबत भाष्य केले. रझा अकादमीचा फतवा हास्यास्पद असून रेहमान यांना घरवापसी करण्याची इच्छा असल्यास त्याचे आम्ही खुल्या मनाने स्वागतच करु. देशातून फतवा संस्कृती हद्दपास व्हायला हवी, असे आदित्यनाथ म्हणाले.
संगीतकार ए.आर.रेहमान विरोधात फतवा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा