नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मॉस्को आणि कीव भेटीनंतर युक्रेन संघर्षावर तोडगा काढण्याचे आवाहन भारताने केले होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल येत्या आठवड्यात रशिया दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. डोभाल प्रामुख्याने ब्रिक्स (ब्राझील-रशिया-भारत-चीन-दक्षिण आफ्रिका) गटांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या परिषदेला उपस्थित राहण्यासाठी रशियाला भेट देत आहेत. दोन्ही देशांमधील संघर्ष संपवण्यासाठी होत असलेल्या शांततापूर्ण चर्चेच्या टप्प्यावर ही परिषद होणार आहे.

हेही वाचा >>> शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न; विद्यार्थी आंदोलनादरम्यान सामूहिक हत्याकांडाचा आरोप

Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
butter theft in russia amid ukrain war
युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे रशियात बटरची चोरी; नेमकं प्रकरण काय?
wani vidhan sabha constituency BJP kunbi statement bag inspection
वणीत भाजपमागे शुक्लकाष्ठ, कुणबी वक्तव्यानंतरचे बॅग तपासणी प्रकरण अंगलट येण्याची शक्यता
Maharashtra assembly elections 2024 independent candidate getting support from mahayuti maha vikas aghadi Unsatisfied leader in bhandara Vidhan sabha
भंडारा विधानसभेत अपक्ष उमेदवारांचा बोलबाला? युती-आघाडीतील असंतुष्ट अपक्षांच्या पाठिशी!
sex ministry in russia
‘या’ देशात स्थापन होणार सेक्स मंत्रालय? डेटिंग अन् लग्नासाठीही सरकार पुरवणार आर्थिक साह्य? कारण काय?

डोभाल या दौऱ्यावर रशियन समकक्षांशी चर्चा करतील आणि या भागात शांतता प्रस्थापित करण्याच्या उपाययोजनांवर विचारविनिमय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युक्रेनची राजधानी कीव दौऱ्याच्या अडीच आठवड्यांनंतर डोभाल यांचा रशिया दौरा होत आहे. शनिवारी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी युक्रेनचे अध्यक्ष लोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. भारत आणि चीन हे दोन्ही देशच वादावर तोडगा काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे त्यांनी सांगितले.

रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी गुरुवारी व्लादिवोस्तोक शहरातील ‘ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम’च्या पॅनेल चर्चेत बोलताना भारत, ब्राझील आणि चीन या देशांना संभाव्य ‘मध्यस्त’ म्हणून संबोधले. हे देश विवाद सोडवण्यासाठी भूमिका बजावू शकतात, असे ते म्हणाले. ‘मी चीन, ब्राझील आणि भारत या माझ्या भागीदारांच्या संपर्कात आहे. या देशांचे नेते आणि आमचे एकमेकांशी विश्वासाचे संबंध आहेत. ते या वादात स्वारस्य दाखवतील, असेही त्यांनी नमूद केले.