पीटीआय, नवी दिल्ली

बीबीसीचा गुजरात दंगलीवरील वृत्तपट दिल्ली विद्यापीठ परिसरामध्ये दाखविल्याबद्दल एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेच्या नेत्यावर एका वर्षांसाठी घालण्यात आलेले प्रतिबंध दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केले.गुजरातमध्ये झालेल्या दंगलींवर बीबीसीने ‘इंडिया – द मोदी क्वेश्चन’ हा वृत्तपट तयार केला होता. केंद्र सरकारने त्यावर बंदी घातल्यानंतर देशातील अनेक विद्यापीठांमधील डाव्या आणि काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटनांनी या वृत्तपटाचे प्रदर्शन आयोजित केले.

दिल्ली विद्यापीठातील पीएच.डी.चा विद्यार्थी आणि एनएसयूआयचा नेता लोकेश चुग याच्यावर वृत्तपट प्रदर्शित केल्याचा आरोप करत एका वर्षांसाठी प्रतिबंध घालण्यात आले. याविरोधात लोकेशने केलेल्या याचिकेवर न्यायालयाने गुरुवारी निलंबनाला स्थगिती देतानाच विद्यापीठाने लोकेशला आपले म्हणणे मांडण्याची संधी न देता कारवाई केल्याचे ताशेरे ओढले. शिस्तपालन समितीच्या बैठकीमध्ये लोकेशने दिलेल्या स्पष्टीकरणाचा विचार करण्यात आला नसल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

Story img Loader