राष्ट्रीय वाघ संवर्धन प्राधिकरणाने पांढऱ्या वाघांना पुन्हा मध्यप्रदेशात आणण्यास नकार दिला असून या वाघांचे संवर्धन मूल्य काहीच नाही असे कारण सांगून बोळवण केली आहे. खरेतर पांढरे वाघ हे जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे असताना प्राधिकरणाने हा निर्णय घेतल्याने वाघांच्या या दुर्मीळ प्रजातीला वाचवण्याच्या मध्यप्रदेश सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे.
प्राधिकरणाच्या तांत्रिक समितीची मध्य प्रदेशच्या वन अधिकाऱ्यांसमवेत काहीकाळापूर्वी बैठक झाली त्यात पांढऱ्या वाघांना मध्य प्रदेशात नो एंट्रीचा निर्णय झाला. मध्यप्रदेशच्या मुख्य वन संरक्षकांनी पांढऱ्या वाघांना राज्यात प्रवेश द्यावा अशी मागणी केली होती. पण प्राधिकरणाने त्यावर  पांढरे वाघ म्हणजे रॉयल बंगाल टायगरचे भ्रष्ट रूप असल्याचे सांगत प्रस्ताव फेटाळून लावला. भोपाळ येथील वन्यजीव कार्यकर्ते अजय दुबे यांनी माहिती अधिकारात जी माहिती मिळवली त्यात या या बैठकीचा तपशील मिळाला. राज्य सरकार सिद्धी जिल्ह्य़ात संजय व्याघ्र प्रकल्पात पांढऱ्या वाघांच्या जोडींचे संवर्धन करीत असून आता मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ओडिशातील  नंदन कानन अभयारण्यातील पांढऱ्या वाघांची जोडी मागितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा