फ्रान्समध्ये बांधण्यात येणाऱ्या पहिल्या युरोपियन प्रेशराइज्ड रिअॅक्टर (ईपीआर) या आण्विक प्रकल्पाच्या बांधकामाची किंमत सुमारे २ अब्ज युरोंनी वाढेल तसेच हे बांधकाम पूर्ण होण्यासही नियोजित वेळेपेक्षा ६ वर्षे उशीर होईल, असा अंदाज फ्रान्समधील विद्युतनिर्मिती करणारी सरकारी कंपनी इलेक्ट्रिसिटी डी फ्रान्सने वर्तविली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकल्प उभारण्याचे कंत्राट भारतातील जैतापूर येथे आण्विक प्रकल्प उभारणाऱ्या अरेवा या फ्रेंच कंपनीलाच देण्यात आले होते. फ्रान्समध्ये १६०० मेगावॉटचा अणू ऊर्जा प्रकल्प उभारणीचे कंत्राट अरेवा या कंपनीला देण्यात आले होते. नियोजनानुसार हा प्रकल्प २०१० मध्ये कार्यान्वित होणे अपेक्षित होते. मात्र हा प्रकल्प कार्यान्वित होण्यास ६ वर्षे उशीर होईल, असा अंदाज आहे.
दरम्यान, भारतामध्ये अरेवा कंपनीलाच कंत्राट मिळालेले असल्याने तसेच कोणताही प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास येथे होणारा उशीर लक्षात घेता जैतापूर येथील प्रकल्पाचा बांधणी खर्च कितीने वाढेल, याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. प्रस्तावित आकडेवारीनुसार, ९९०० मेगावॉटच्या या प्रकल्पाचा बांधणी खर्च १ लाख ८६ हजार कोटी रुपये येणे अपेक्षित होते. मात्र, या कंपनीने सादर केलेले आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवीन दर लक्षात घेता हा खर्च ३ लाख ८५ हजार कोटी रुपयांवर जाईल, अशी भीती काही स्वदेशी जागरण मंचाचे कार्यकर्ते आणि जैतापूर प्रकल्प विरोधी आंदोलक अनिल गचके यांनी व्यक्त केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा