भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी रशियाचे संरक्षण मंत्री सेर्गेई शोइगु यांच्याशी फोनवरून संवाद साधला आहे. यावेळी राजनाथ सिंह यांनी युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धात ‘डर्टी बॉम्ब’वापरण्याच्या कथित धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. युक्रेनकडून ‘डर्टी बॉम्ब’चा वापर केला जाईल, याची आम्हाला चिंता आहे, असं शोईगु यांनी मंगळवारी सांगितलं होतं. त्यानंतर कथित ‘डर्टी बॉम्ब’चा हल्ला रोखण्यासाठी रशिया अणुहल्ला करू शकतो, याबाबत जगभरात चिंता व्यक्त केली गेली.

याच पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सेर्गेई शोइगु यांच्याशी फोनवरून संवाद साधला. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी लवकरात लवकर मुत्सद्देगिरी आणि चर्चेच्या माध्यमातून हा संघर्ष सोडवावा, असं आवाहन राजनाथ सिंह यांनी केलं. कोणत्याही परिस्थितीत अणुयुद्ध टाळलं पाहिजे, कारण अशा शस्त्रांचा वापर मानवतेच्या मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध आहे, असंही राजनाथ सिंह म्हणाले.

Russias Voronezh radar system
चीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताला रशियाची मदत! काय आहे वोरोनेझ रडार प्रणाली?
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
russia ins tushil
रशियाने भारताला सुपूर्द केली क्षेपणास्त्राने सुसज्ज युद्धनौका; ‘आयएनएस तुशील’ काय आहे? भारतासाठी याचे महत्त्व काय?
Image of Zelensky
Russia Vs Ukraine War : “जोपर्यंत नाटोचे सदस्यत्व…”, झेलेन्स्की यांनी का केली युक्रेनमध्ये परदेशी सैन्य तैनात करण्याची मागणी?
India Bangladesh relations, Foreign Secretary talks
भारत-बांगलादेश संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न, परराष्ट्र सचिवस्तरीय चर्चेत हिंदूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त
Narendra Modi Syria
सीरियावर बंडखोरांचा ताबा; भारताची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “देशाची अखंडता जपण्यासाठी…”
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
Arif Mohammed Khan
Arif Mohammed Khan : केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचं भगवद्गीतेबद्दल मोठं विधान; म्हणाले, “हा भारताचा…”

दरम्यान, शोईगु यांनी रविवारी या विषयावर नाटोच्या संरक्षणमंत्र्यांशी अनेकदा चर्चाही केली होती. तर किरणोत्सर्गी धोकादायक बॉम्ब वापरण्याच्या तयारीत असल्याचा रशियाचा आरोप युक्रेन आणि त्याच्या मित्र राष्ट्रांनी फेटाळला, उलट रशिया अशा गोष्टींचा वापर करून युद्ध आणखी वाढवत आहे, असा आरोप युक्रेनने केला आहे. रशिया आणि युक्रेनमधील संघर्षांच्या पार्श्वभूमीवर रशियाच्या संरक्षणमंत्र्यांच्या पुढाकाराने हे संभाषण झाले. संघर्ष थांबवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या मार्गाचा अवलंब करण्याच्या भारताच्या भूमिकेचा सिंह यांनी पुनरुच्चार केला, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

युक्रेनकडून ‘डर्टी बॉम्ब’चा हल्ला होऊ शकतो, याबाबत शोईगु यांनी भीती व्यक्त केल्यानंतर, भारतीय दूतावासाने खबरदारीचं पाऊल उचललं आहे. युक्रेनमधील सर्व भारतीय नागरिकांनी लवकरात लवकर युद्धभूमीतून बाहेर पडावं, असा आदेश भारतीय दूतावासानं दिला आहे. तसेच भारतीय नागरिकांना कसलीही मदत आवश्यक असेल तर भारतीय दूतावासाची संपर्क साधावा, असंही आदेशात म्हटलं आहे.

‘डर्टी बॉम्ब’ म्हणजे काय?
‘डर्टी बॉम्ब’ हा एक धोकादायक बॉम्ब आहे. यामध्ये किरणोत्सारी घटकांचा वापर केला जातो. डर्टी बॉम्बच्या स्फोटानंतर यातील विषारी घटक हवेत पसरतात. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होऊ शकतो. डर्टी बॉम्ब हा अणुबॉम्बएवढा विध्वंसक नसला तरी लाखो लोकांचं जीवनमान उद्धवस्त करण्याची क्षमता या बॉम्बमध्ये असल्याचं मत तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे.

Story img Loader