हरियाणातील नूह जिल्ह्यांत ३१ जुलै रोजी उफाळलेल्या हिंसाचारप्रकरणी नूह पोलिसांनी बजरंग दलाचा नेता राज कुमार उर्फ बिट्टू बजरंगी याला अटक केली आहे. त्याच्या अटकेचा थरार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. यावेळीही त्याने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी शिताफीने त्याला अटक केली आहे.

व्हिडीओत कैद झाला घटनाक्रम!

बिट्टू बजरंगीला पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले होते. या पथकात २० हून अधिक अधिकाऱ्यांचा समावेश होता. बिट्टूला पकडण्यासाठी पोलिसांनी प्लान आखला होता. त्यानुसार, त्यांनी साध्या वेषातच अटक कार्य राबवलं. साध्या वेषात आलेल्या पोलिसांच्या हाती फक्त लाठ्या होत्या. पोलीस आल्याचे समजताच बिट्टू पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. परंतु, पोलिसांनी फरीदाबादच्या डेबुआ येथे त्याचा पाठलाग करत त्याला पकडले.

nia raided Chayanagar Amravati and detained suspected youth for questioning
‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Kurla accident case CCTV from bus seized Mumbai news
कुर्ला अपघात प्रकरणः बसमधील सीसीटीव्ही ताब्यात, २५ जणांचा जबाब नोंदवला
mumbai best bus crash driver gets police remand till dec 21
कुर्ला अपघातःचालकाला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांत अटक; २१ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी
kidnap of uncle of MLA Yogesh Tilekar, Yogesh Tilekar uncle, Yogesh Tilekar latest news,
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण, पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध
in pune Karvenagar area drunk gang attacked youth due petty dispute
कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा
man murder over property dispute, Mumbai ,
मुंबई : मालमत्तेच्या वादातून ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या, दोघांना अटक
Hindu outfit Hindu Sangharsh Samiti attack on Bangladesh mission
Attack on Bangladesh Mission : त्रिपुरातील बांगलादेशी उच्चायुक्तालयावर हल्ला करणारी हिंदू संघटना फक्त आठवडाभर जुनी; नेमकं झालं काय?

बिट्टूसह १५-२० जणांविरोधात गुन्हा दाखल

नूह पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी नूह पोलीस ठाण्यात एएसपी उषा कुंडू यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावरील आरोपांमध्ये सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी शक्तीचा वापर करणे गुन्ह्यांखाली दंगल आणि शस्त्रास्त्र कायद्याचे कलम २५ अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, एफआयआरमध्ये बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याबद्दल विविध आयपीसी कलम आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत इतर १५-२० व्यक्तींची नावे आहेत.

हेही वाचा >> सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक यांचे निधन, दिल्लीतील एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास

ASP च्या तक्रारीत असे म्हटले आहे की, “३१ जुलै रोजी, जलअभिषेक यात्रेसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मी कर्तव्यावर होतो. त्यावेळी दुपारी १२.३० वाजता नल्हार मंदिरापासून ३०० मीटर अंतरावर, मंदिराकडे जाणाऱ्या १५-२० लोकांच्या एका गटाशी माझा सामना झाला. आम्ही लोकांना यात्रेदरम्यान शस्त्रे बाळगू नयेत असे सांगितले होते. त्यांच्यापैकी काहींनी तलवारी आणि त्रिशूळसारखी शस्त्रे हाती घेतली होती. माझ्या कर्मचार्‍यांच्या मदतीने मी त्यांना ही शस्त्रे वापरण्यापासून आणि हानी पोहोचवण्यापासून रोखण्यात यशस्वी झालो.”

दरम्यान, दंगलीनंतर बिट्टू बजरंगी नावाच्या एका व्यक्तीला सोशल मीडियाद्वारे ओळखण्यात आले. बिट्टू बजरंगीच्या साथीदाराने पोलिसांच्या हातातून शस्त्रे पळवण्याचा प्रयत्न केला होता, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

“आम्ही पोलीस दलाच्या मदतीने ही शस्त्रे ताब्यात घेतली आणि आमच्या वाहनात ठेवली. बजरंगी आणि त्याचे सहकारी नंतर वाहनासमोर बसले आणि पोलिसांविरोधात घोषणा देऊ लागले. त्यांनी गाडीची मागील खिडकी तोडली. तसंच, आम्ही जप्त केलेली शस्त्रे त्यांनी काढून घेतली. पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी धमकावले”, असंही पोलिसांनी एफआयआरमध्ये नोंदवलं आहे.

हेही वाचा >> ४३० रुपये किमतीच्या खोट्या नोटांसाठी ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा, सुप्रीम कोर्टाने केली सुटका

फरिदाबाद पोलिसांचे प्रवक्ते सुबे सिंग यांनी सांगितले की, बजरंगीच्या साथीदारांची ओळख व्हिडीओच्या माध्यमातून तपासली जात आहे. फरिदाबाद सायबर पोलीस या प्रकरणी सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत. कोणत्याही जाती/धर्म/समुदायातील कोणी सोशल मीडियावर भडकवणारी भाषणे किंवा मजकूर पोस्ट केल्यास, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल” असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

Story img Loader