पीटीआय, बोलपूर/हावडा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोलकाता येथील आर. जी. कर वैद्याकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाने पश्चिम बंगालमध्ये आधीच तणाव असताना, राज्यातील दोन विविध ठिकाणच्या रुग्णालयांत परिचारिका आणि एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणांतील आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पहिली घटना बीरभूम जिल्ह्यातील एका सरकारी रुग्णालयात घडली. शनिवारी रात्री उशिरा तीव्र ताप असलेल्या रुग्णाने ‘इल्लमबाजार ब्लॉक’ रुग्णालयात परिचारिकेच्या विनयभंगाचा प्रयत्न केला. रुग्णालय प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. यानंतर त्याला अटक करण्यात आली. या रुग्ण आरोपीला उपचारासाठी बोलपूर उपविभागीय रुग्णालयात पाठवले असल्याची माहिती बीरभूमचे मुख्य वैद्याकीय अधिकारी हिमाद्री अरी यांनी दिली. या प्रकाराच्या निषेधार्थ रविवारी रुग्णालयातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी डॉक्टरांना २४ तास सुरक्षा मिळावी या मागणीसाठी रॅली काढली.

हेही वाचा >>>Odisha Liquor Ban : “ओडिशात दारूबंदी करा किंवा मद्यपींसाठी विमा योजना आणा”, बीजेडी आमदाराची मागणी

दुसरी घटना हावडा जिल्ह्यात घडली. येथील सरकारी रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हावडा जिल्हा मुख्यालय रुग्णालयात शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. गेल्या आठवड्यात पीडित १२ वर्षांच्या मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञाने तिला अयोग्यरीत्या स्पर्श केला. त्यामुळे ती रडत बाहेर आली. या प्रकरणाबद्दल तिने कोणाला सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही त्याने दिली, असे कुटुंबीयांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी प्रयोगशाळा तंत्रज्ञाला अटक करण्यात आली असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.