जर्मनीत पुन्हा करोनाचा हाहाकार वाढत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लसीकरण केल्या जात आहे. या लसीकराणादरम्यान, जर्मनीत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. एका नर्सनं तब्बल ८६०० जणांना लसीच्या ऐवजी मिठाचं पाणी टोचलं आहे. ही घटना एप्रिल महिन्यातील आहे. मात्र या घटनेचा खुलासा आता झाला आहे.
चांगली गोष्ट म्हणजे या लोकांना दिलेले मीठ पाण्याचे इंजेक्शन हानिकारक नव्हते. त्यामुळे त्यांच्या शरीरात कोणतीही दुखापत झाली नाही. एप्रिलमध्ये फायझर लसीची कुपी सांडल्यानंतर, एका जर्मन नर्सने मिठाच्या पाण्याची कुपी उचलली आणि लोकांना लस दिली.
“या प्रकरणामुळे मला पूर्णपणे धक्का बसला आहे,” असे एक स्थानिक नागरिक स्वेन अॅम्ब्रोसीने फेसबुकव म्हटले आहे. दरम्यान, स्थानिक अधिकाऱ्याने ८६०० स्थानिक रहिवाशांना कॉल केले आणी त्यांचा आरोग्याबाबत जाणून घेतले. तसेच त्यांनी आनखी एक करोना डोस घेण्यास सांगितले.
या घटनेचा तपास करत असलेले पोलीस तपासनीस पीटर बीअर एका पत्रकार परीषदेत म्हणाले, साक्षीदारांच्या स्टेटमेंट नुसार हे खुप धोकादायक होते. अज्ञात नर्सचा हेतू स्पष्ट नव्हता, तिने सोशल मीडिया पोस्टमध्येदेखील लसीबद्दल संशयास्पद मते पसरवली होती, असे पोलीस तपासात समोर आले आहे.