अफगाणिस्तानातून पुढील एका वर्षात ३४ हजार अमेरिकी सैनिकांना मायदेशी परत बोलावण्यात येईल, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मंगळवारी केली. गेल्या सुमारे दशकभरापासून अफगाणिस्तानात सुरू असलेली अमेरिकेची कारवाई २०१४मध्ये संपुष्टात येणार आहे.
कॉंग्रेसपुढे केलेल्या भाषणात ओबामा म्हणाले, पुढील वर्षभरात अफगाणिस्तानातील सैनिकांच्या हाती तेथील सुरक्षेची जबाबदारी सोपविण्यात येईल. अमेरिकी सैनिक हे केवळ मदतीचे काम करतील. त्यानंतर हळूहळू वर्षभराच्या काळात ३४ हजार सैनिकांना मायदेशी परत बोलावले जाईल. वर्षभर हा कार्यक्रम सुरू राहील. २०१४ मध्ये अफगाणिस्तानातील कारवाई संपुष्टात येईल.
अमेरिकेने याआधी दिलेल्या आश्वासनानुसार सन २०१४ नंतर सार्वभौम अफगाणिस्तानची निर्मिती करण्यात येईल. अफगाणिस्तानातील सरकारबरोबर सध्या दोन महत्त्वाच्या मुद्दयांवर करार करण्यात येत आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा हा अफगाणिस्तानातील सैनिकांना प्रशिक्षण देण्याचा आहे. जेणेकरून पुन्हा अफगाणिस्तानात गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये. दुसरा मुद्दा हा दहशतवादविरोधी लढ्याचा आहे. ज्यामुळे अल-कायदासारख्या संघटनांच्या मुसक्या आवळता येतील, असे ओबामा यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा