व्हिएतनामला शस्त्रास्त्र विक्रीवरची बंदी उठवण्याबाबची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या दौऱ्यात केली आहे. एके काळचा शत्रू असलेल्या व्हिएतनामवर चार दशके शस्त्रास्त्र र्निबध होते. व्हिएतनामचे अध्यक्ष ट्रॅन डाइ क्वँग यांच्यासमवेत संयुक्त पत्रकार परिषदेत ओबामा यांनी सांगितले, की व्हिएतनामला शस्त्रास्त्र विक्रीवरचे र्निबध उठवण्यात येत आहेत. अमेरिकेने दक्षिण चिनी सागरात चीनची वाढती दादागिरी व लष्करी मोर्चेबांधणी पाहून हा निर्णय घेतला आहे. ओबामा यांनी मात्र शस्त्रविक्रीवर बंदी उठवण्याच्या निर्णयाचा चीनने दक्षिण सागरात केलेल्या कारवायांशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. व्हिएतनामबरोबरचे संबंध सुरळीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ओबामा यांनी स्पष्ट केले. सध्या दोन्ही देशात विश्वास व सहकार्याचे वातावरण असून त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, त्याचे आम्ही स्वागत करतो, असे व्हिएतनामचे नेते क्वँग यांनी सांगितले. दोन देशातील रक्तरंजित संघर्षांनंतर अमेरिकी अध्यक्ष ४१ वर्षांनी व्हिएतनामला भेट देत असून शस्त्रास्त्र र्निबध उठवणे हे सूचक मानले जात आहे. अमेरिका आशिया-पॅसिफिक देशात व्यापार संधींची चाचपणीही करीत आहे. व्हिएतनामच्या लष्कराने लष्करी खर्च २००५ पासून १३० टक्के वाढवला आहे, असे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने म्हटले आहे. व्हिएतनामकडे असलेली शस्त्रे रशियन बनावटीची व जुनाट आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा