अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली असून दोन जागतिक परिषदांच्या निमित्ताने उभय नेत्यांनी परस्परांशी थेट चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. पुतीन यांचे परराष्ट्रधोरणविषयक सहायक युरी उशॉकोव्ह यांनी सांगितले की, जी २० देशांची शिखर परिषद रशियात सेंट पीटर्सबर्ग येथे सप्टेंबरच्या सुमारास होत आहे. त्यावेळी भेटण्याचा निर्णय या चर्चेत झाला. तसेच त्याआधी १७-१८ जूनला उत्तर आर्यलडमध्ये जी-८ समूहाची परिषद आहे, तेथेही चर्चा करण्याचे दोघांनी ठरविले आहे. भेटीच्या तारखांचा निश्चित तपशील मात्र त्यांनी दिला नाही. सिरिया प्रश्नावर सहकार्य वाढविण्यासंबंधात तसेच दहशतवादविरोधी लढय़ासंबंधात उभय नेत्यांमध्ये काही करार अपेक्षित आहेत.

Story img Loader