जागतिक आर्थिक मंदीच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी पेप्सीकोच्या कार्यकारी अधिकारी इंदिरा नूयी यांच्यासोबत आणखी दोन अर्थतज्ञांना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आमंत्रित केले आहे. व्यवसाय, रोजगार, नागरी प्रश्नांवर या तज्ज्ञांमध्ये चर्चा अपेक्षित आहे. सेंटर फॉर अमेरिकन प्रोग्रेस या संस्थेच्या अध्यक्षा नीरा टंडन आणि सेंटर फॉर कम्युनिटी चेंज संस्थेतील अभ्यासक दीपक भार्गव ही इतर दोघा तज्ज्ञांची नावे आहेत. या आठवडय़ामध्ये ओबामा विविध विषयांतील तज्ज्ञांना अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काय करता येईल याविषयी चर्चा करणार असल्याचे व्हाईट हाऊसतर्फे स्पष्ट करण्यात आले. बुधवारी ओबामा व्यवसाय क्षेत्रातील दिग्गजांशी हितगूज करतील. इतर तज्ज्ञांमध्ये आंतरराष्ट्रीय रोजगारमंत्री के हेन्री, नागरी संस्थेतील अधिकारी ली सॉण्डर्स, शिक्षण क्षेत्रातील डेनिस व्हॅन रोकेल, कामगार आणि औद्योगिक मंत्री रिच त्रुमका आदी उपस्थित राहणार आहेत.
ओबामांचे नूयी यांना निमंत्रण
जागतिक आर्थिक मंदीच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी पेप्सीकोच्या कार्यकारी अधिकारी इंदिरा नूयी यांच्यासोबत आणखी दोन अर्थतज्ञांना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी आमंत्रित केले आहे.
First published on: 13-11-2012 at 05:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obama invites indra nooyi for consultation on economy