भारतात सत्तेवर येणाऱया नव्या सरकारसोबत जवळून काम करून पुढील वर्षांमध्ये बदल घडवून आणण्यास आपण उत्सुक असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. देशातील लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी झाले. आता येत्या शुक्रवारी मतमोजणीनंतर नागरिकांनी कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. हे स्पष्ट होईल. देशातील या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओबामा यांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मतमोजणीनंतर देशात नवे सरकार सत्तेत येईल. या सरकारसोबत जवळून काम करून पुढील वर्षांमध्ये बदल घडवून आणण्यास आपण उत्सुक आहोत. देशातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्याबद्दल मी सर्व भारतीयांचे अभिनंदन करतो. जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाने मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून नवे उदाहरण घालून दिले आहे.
भारत आणि अमेरिका या दोन्ही पक्षांनी गेल्या दशकभरात पक्षांचा विचार न करता आपल्यातील मैत्री अजून घट्ट केली आहे, याचाही उल्लेख ओबामा यांनी आपल्या निवेदनात केला आहे.
भारतातील नव्या सरकारसोबत काम करण्यास उत्सुक – ओबामा
भारतात सत्तेवर येणाऱया नव्या सरकारसोबत जवळून काम करून पुढील वर्षांमध्ये बदल घडवून आणण्यास आपण उत्सुक असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.

First published on: 13-05-2014 at 11:17 IST
TOPICSबराक ओबामाBarack Obamaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Obama looking forward to work with new indian government