अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी गुरुवारी पोप फ्रान्सिस यांची ऐतिहासिक भेट घेतली. प्रथमच झालेल्या या भेटीत दोघांनी जगातील विषमतेच्या मुद्दय़ावर चर्चा केली.
ओबामा यांनी सांगितले की, ते पोप फ्रान्सिस यांचे मोठे प्रशंसक आहेत. या चर्चेमुळे ओबामांच्या कॅथलिक मतदारांसह घरच्या समर्थकांमध्येही वाढ होईल, असे राजकीय पंडितांनी म्हटले आहे.
पोप यांच्या भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळात ओबामा यांच्यासह अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी आणि अन्य मान्यवर होते. ओबामा हे पहिले आफ्रिकी अमेरिकी वंशाचे अमेरिकेचे अध्यक्ष असून ज्यांनी लॅटिन अमेरिकेतील पहिले असणाऱ्या पोपशी चर्चा केली. पोप फ्रान्सिस हे जगभरातील लोकांसह माझेही प्रेरणास्थान आहेत. मात्र सर्वच विषयांवर आमचे एकमत नाही आहे, असेही ओबामा यांनी एका दैनिकाशी बोलताना सांगितले. क्रायमिया प्रकरणाचे सावट असलेल्या सहा दिवसांच्या युरोप दौऱ्यानंतर पोप यांच्याशी चर्चा झाल्यामुळे ओबामा आनंदित झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा