अमेरिकेने येत्या तीन वर्षांत एड्स व एचआयव्हीचा सामना करण्यासाठी ५ अब्ज डॉलर्स देण्याची तयारी दर्शवली आहे. उर्वरित जग यावर जो खर्च करते त्यापेक्षा ही रक्कम दुप्पट आहे.
एड्स या विषयावरील धोरणात्मक भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले, की अमेरिका येत्या तीन वर्षांत एड्सवर ५ अब्ज अमेरिकी डॉलर खर्च करील. ब्रिटननेही तशाच प्रकारचे आश्वासन दिले आहे. एचआयव्ही व एड्स यांचा मुकाबला करण्यात जगात अमेरिका आघाडीवर राहील. आगामी काळ बघितला तर एड्सचा मुकाबला करण्यासाठी एकजुटीची गरज आहे. पुढील वर्षी एड्सबाबत अमेरिकेत ग्लोबल फंड, युएन एड्स व सिव्हिल सोसायटी या भागीदार संस्थांची बैठक सरकारबरोबर होईल. एड्सचे प्रमाण कमी झाल्याशिवाय आम्ही आमचे प्रयत्न चालूच ठेवू. त्यासाठी जागतिक निधीला पाठिंबा कायम राहील, या निधीमुळे १४० देशांतील ६० लाख लोकांना फायदा झाला असून, त्यांना अँटीरेट्रोव्हायरल उपचारपद्धतीतील औषधे मिळत आहे. एचआयव्हीचा संसर्ग बरा करण्यासाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ या संस्थेत संशोधनात नव्याने पुढाकार घेतला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. या प्रकल्पात १० कोटी डॉलर इतकी रक्कम नव्या उपचार पद्धती विकसित करण्यासाठी वापरली जाईल. एचआयव्हीचा कायमचा नायनाट करण्यासाठीच्या संशोधनात अमेरिका आघाडीवर आहे असेही त्यांनी सांगितले.देणगीदार देश सोडून इतर देशांनीही जास्तीत जास्त निधी दिला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एड्सविरोधात  एकत्र येणे गरजेचे आहे. लहानमोठी राष्ट्रे, दानशूर व्यक्ती व संस्था, विद्यापीठे माध्यमे, नागरी समुदाय व कार्यकर्ते यांचा सहभाग त्यात महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन ओबामा यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा