कृष्णवर्णीय युवक ट्रॅव्हॉन मार्टिन याच्या हत्येप्रकरणी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी, ३५ वर्षांपूर्वी आपलीही अवस्था मार्टिनसारखीच झाली असती, अशी मार्मिक प्रतिक्रिया नोंदविली आहे. ओबामा यांनी आपले वैयक्तिक अनुभव सांगत एक प्रकारे भूतकाळातील आठवण कथित केली.
मार्टिनवर गोळीबार झाला, तेव्हा आपण मार्टिन आपल्याला मुलासारखा असल्याचे प्रारंभी म्हटले होते. याचाच अर्थ असाही होतो की ३५ वर्षांपूर्वी आपलीही अवस्था मार्टिनसारखीच झाली असती, असे ओबामा म्हणाले. ‘व्हाइट हाऊस’च्या वार्तालाप कक्षात पत्रकारांसमवेत चर्चा करीत असताना ओबामा यांनी आपली मते मांडली. ट्रॅव्हान मार्टिन या १७ वर्षांच्या कृष्णवर्णीय युवकाची गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात फ्लोरिडामध्ये गोळ्या घालून हत्या झाल्यानंतर अमेरिकेत सध्या मोठे वादळ उठले आहे. याप्रकरणी जॉर्ज झिम्मरमन या सुरक्षारक्षकावर ठपका ठेवण्यात आला होता. आपण स्वरक्षणार्थ मार्टिनवर गोळीबार केला होता, असा दावा त्याने केला आणि गेल्याच आठवडय़ात जॉर्जची फ्लोरिडा न्यायालयात सुटका करण्यात आली होती. त्यानंतर ओबामा यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली. जातीय समस्येचा सामना करावा लागलेला नाही, असे फारच थोडे कृष्णवर्णीय असतील, असा दावा ओबामा यांनी केला. एखाद्या डिपार्टमेण्टल स्टोअरमध्येही ज्यांचा पाठलाग केला जात नाही, असे अमेरिकेत फार कमी आफ्रिकन अमेरिकी कृष्णवर्णीय आहेत आणि आपण त्यापैकी एक होतो. तसेच असेही आफ्रिकन अमेरिकी कृष्णवर्णीय आहेत की लिफ्टमध्ये शिरल्यानंतर त्यांना बघितले की तेथे असलेली महिला आपली पर्स नाराजीने बाजूला घेते आणि तेथून बाहेर पडेपर्यंत तिने आपला श्वास रोखून धरलेला असतो, असे ओबामा म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा