अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी पत्नी मिशेल ओबामा यांच्या धाकामुळे आपण सिगारेट सोडल्याची कबुली दिलीये. एका कार्यक्रमानंतर अनौपचारिक गप्पांमध्ये ओबामा यांनी ही कबुली दिली.
अमेरिकेतील एका सभेमध्ये ओबामांनी ‘नागरी संस्थाचे महत्त्व’ या विषयावरील चर्चेमध्ये भाग घेतला होता. ‘सीएनएन’कडे असलेल्या एका टेपमध्ये या चर्चेच्या शेवटी ओबामा उपस्थितांशी अनौपचारिक गप्पा मारताना टिपण्यात आले आहे. या गप्पांमध्ये ओबामा त्यांच्या जवळ उभ्या असलेल्या व्यक्तिला त्यांनी सिगारेट सोडली असल्याचे सांगत आहेत.
ओबामा यांना प्रश्न विचारण्यात आल्यावर प्रश्नांना हसत उत्तर देत, “मी गेली सहा वर्षे पत्नी मिशेल हिच्या धाकामुळे सिगारेटला हात लावलेला नाही,” असे ते म्हणाले.    
सध्या प्रकृती ठणठणीत असलेल्या ओबामा यांचे आरोग्य काही वर्षांपूर्वी अतिधुम्रपानामुळे ढासळले होते. त्यांनी तरूण असताना मोठ्या प्रमाणावर सिगारेट ओढत असल्याचे कबुल केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा